पुणे : परकीय चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची साडेचार लाखांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी अहमदाबादमधून येरवडा पोलिसांनी एकास अटक केली. न्यायालयाने त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. शशांक दिनेशभाई पराडिया (वय २८, रा. अहमदाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पराडिया याच्यासह तीन साथीदारांच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर संपर्क साधला होता. फॉरेक्स फॅक्टरी करन्सी ब्रोकर असल्याची बतावणी आरोपींनी केली होती. परकीय चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : तरुणीकडील ४० हजारांचा मोबाइल संच हिसकावला

ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाइन पद्धतीने एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी एका बँक खात्यात दोन लाख आठ हजार ५०० रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केली. गुंतवणूक केलेल्या रक्कमेवरील परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींनी एकूण मिळून चार लाख ४२ हजार ७५५ रुपयांची फसवणूक केल्याचे ज्येष्ठ नागरिकाने फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तपास करुन पराडियाला अटक केली. पराडियाला बुधवारी (१७ ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी अशा पद्धतीने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास करायचा आहे. आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील ॲड. योगेश कदम यांनी युक्तिवादात केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for cheating senior citizen over foreign investment zws