man-arrested-for-raping-school-girl | Loksatta

शाळकरी मुलीवर तरुणाकडून बलात्कार; आरोपीस अटक

आरोपीने पीडितेला आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.

शाळकरी मुलीवर तरुणाकडून बलात्कार; आरोपीस अटक
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

पुण्यातील खडकी परिसरात शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी खडकी पोलिसांनी एका तरुणास अटक केली. प्रणय अशोक माने (वय १८, रा. नाझरवाडा, खडकी बाजार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- VIDEO : ना रस्ता, ना रुग्णवाहिका! उपचारासाठी ५५ वर्षीय महिलेचा सहा किलोमीटर झोळीतून प्रवास

आरोपीस अटक

आरोपी मानेशी शाळकरी मुलीची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. मानेने तिला आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली. या घटनेची माहिती कोणाला दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मानेने मुलीला दिली. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा तसेच बलात्कार केल्या प्रकरणी मानेला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक मगदूम तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-09-2022 at 14:01 IST
Next Story
VIDEO : ना रस्ता, ना रुग्णवाहिका! उपचारासाठी ५५ वर्षीय महिलेचा सहा किलोमीटर झोळीतून प्रवास