पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या ठेकेदार कंपनीसह इतर दाेघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालय आणि पिंपरी येथील एका हाॅटेलमध्ये घडला. याबाबत अमोल भास्कर गर्जे (३५, रा. मोशी, प्राधिकरण) यांनी पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  एजी इन्व्हायरो ही महापालिकेची ठेकेदार कंपनी आहे. फिर्यादी यांना गर्जे यांना आरोपींनी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. गर्जे यांचा विश्वास संपादन केला.  गर्जे यांच्याकडून व त्यांच्या सहकाऱ्यांकडून २१ लाख २० हजार रुपये ऑनलाइन तसेच रोख स्वरुपात घेतले. मात्र, कोणत्याही प्रकार नोकरी दिली नाही.

फिर्यादी गर्जे यांनी पैशांची वारंवार मागणी करून देखील त्यांना पैसे परत न देता त्यांच्या पैशांचा अपहार केला. तसेच अश्विनी गायसमुद्रे आणि विशाल खांदवे यांच्या पैशांचा देखील अशाच प्रकारे अपहार करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक धनंजय कापरे तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man duped over 21 lakh by promising to get a job in pcmc pune print news ggy 03 zws