लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर वाकडेवाडी परिसरात मेट्रोचा कंटेनर उलटला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. कंटेनर उलटल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली. कोंडीमुळे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि तातडीने कोंडी हटविण्यासाठी प्रयत्न केले. मेट्रो अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यास आली. अवजड कंटेनर उलटल्यानंतर क्रेन मागविण्यात आली. क्रेनचावापर करून अवजड कंटेनर बाजूला काढण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro container overturned in wakadevadi area pune print news rbk 25 mrj