पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने जानेवारी महिन्यात ५९१५ सदनिकांसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे सोडत काढली होती. या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर झाला. मात्र, अनेक अर्जदार आपण प्रतीक्षायादीत आहोत किंवा कसे, हेच समजत नसल्याने संभ्रमात आहेत.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
म्हाडाच्या सोडतींसाठी अर्ज करण्यापासून सदनिकेचा ताबा मिळेपर्यंतच्या कार्यपद्धतीत मानवीय हस्तक्षेप टाळण्यासाठी इंटिग्रेडेट हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम (आयएचएलएमएस) २.० या नवीन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे मंडळांतर्गत जानेवारी महिन्यात ५९१५ सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. मात्र, अर्ज भरताना कागदपत्रांची पूर्तता, कागदपत्रांच्या प्रमाणीकरणासाठी लागणारा वेळ, रहिवास प्रमाणपत्राबाबत जुने की नवे हा संभ्रम अशा विविध कारणांनी नागरिकांच्या तक्रारी आल्या. तसेच नागरिकांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. परिणामी पुणे मंडळाच्या यंदाच्या सोडतीत सर्वांत कमी अर्ज म्हाडाला प्राप्त झाले. सोडतीचा निकालही तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. अखेर गेल्या आठवड्यात २० मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, अद्याप विजेत्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तसेच काही विजेत्यांना मोबाईलवर लघुसंदेश (एसएमएस) पाठविण्यात आले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे सदनिका रद्द झाल्या आहेत. त्यामुळे या सोडतीसाठी अर्ज केलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे.
हेही वाचा – पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ता खरेदी-विक्री जोरात; वर्षभरात साडेसहा हजार कोटींचा महसूल
हेही वाचा – ‘आरटीओ’तील कामे आता घरबसल्या करा
म्हाडाच्या सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गात अर्ज भरला होता. मी विजेता झालो आहे. पुढील प्रक्रियेसाठी संकेतस्थळावर गेल्यानंतर कुठलाच प्रतिसाद मिळत नसून, सदनिका नक्की मिळाली आहे किंवा कसे, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, असे जितेंद्र रायकर म्हणाले.