लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: विश्रांतवाडीमधील कस्तुरबा को ऑप हौसिंग सोसायटीत रविवारी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा सलग मारा करून आटोक्यात आणली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

या पंचमजली इमारतीच्या गच्चीवरील एका मोबाइल टॉवर व नियंत्रण कक्षाला रविवारी दुपारी अचानक आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने इमारतीमधील सर्व रहिवाशी सुरक्षित असल्याची प्रथम खात्री करुन पाचव्या मजल्यावर गच्चीवर होज पाइप घेऊन जात पाण्याचा मारा सुरू करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. इमारतीमधे जीन्यामधे अडगळीचे सामान व आग गच्चीवर असल्याने आग विझवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. आगीचे नेमके कारण समजलेले नाही.