पुणे : वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मोटारचालकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी मोटारचालक लिएंडर पॅट्रीक लोबो (वय २४, रा. हरमेस पार्क, बंडगार्डन रस्ता) याला अटक करण्यात आली. कोंढवा वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी नानासाहेब मोरे यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटारचालक लोबो एनआयबीएम रस्त्याने रात्री जात होता. भरधाव वेगाने जात असलेल्या लोबोने वाहतूक नियमभंग केल्याचे पोलीस कर्मचारी मोरे यांनी पाहिले. त्यांना मोटारचालक लोबो याला थांबविले. तेव्हा लोबोने पोलीस कर्मचारी मोरे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी लोबो याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करत आहेत.