आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी ; शरद पवार यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्ये

अधिवेशनात तसेच इंदापूर येथील भाषणात त्यांनी देशविघातक वक्तव्ये केली आहेत.

ncp demands to file a case against mla gopichand padalkar
राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.

पुणे : आमदार गोपीचंद पडळकर गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्ये करत आहेत. पडळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली असून याबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी ते अवमानकारक वक्तव्ये करत आहेत. अधिवेशनात तसेच इंदापूर येथील भाषणात त्यांनी देशविघातक वक्तव्ये केली आहेत.

हेही वाचा >>> थिएटर ॲकॅडमीच्या अध्यक्षपदी प्रसाद पुरंदरे यांची फेरनिवड  

बारामती, मगरपट्टा ही दोन वेगळी राज्ये निर्माण करावीत, असे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे. पडळकर सातत्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्ये करत असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, महेश पवार, माधव पवार, मधुकर पवार, महेश हंडे , शशिकांत जगताप , दीपक कामठे , शुभम मताळे आदीं या वेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 23:17 IST
Next Story
थिएटर ॲकॅडमीच्या अध्यक्षपदी प्रसाद पुरंदरे यांची फेरनिवड  
Exit mobile version