पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीसरात विविध भोजनगृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भोजन देण्यात येते. मात्र विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांकडून भोजनाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र आता भोजनगृहांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती केली जाणार असून पीएच.डी. करणार्या विद्यार्थ्यांचा या समितीमध्ये समावेश केला जाणार आहे. त्यासाठी नावे कळवण्यासाठी ८ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या सहायक कुलसचिवांनी या संदर्भातील परिपत्रत प्रसिद्ध केले आहे.विद्यापीठ परिसरातील भोजनगृहावर नेमायच्या गुणवत्ता नियंत्रण समितीमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागामध्ये नियमितपणे पी.एच.डी.करीत असलेल्या विद्यार्थ्यांकडून नावे मागवावीत. पी.एच.डी.च्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांचे अर्ज आपल्या मार्गदर्शकांमार्फत गृहव्यवस्थापन विभागात ८ मेपर्यंत सादर करावेत, अशी सूचना देण्यात आली आहे.