पुणे : कोरेगाव पार्कमधील पुलावरुन नदीपात्रात मारली उडी ; अग्निशमन दलाकडून शोधमोहिम

कोरेगाव पार्क भागातील पुलावरुन एकाने नदीपात्रात उडी मारल्याची घटना शनिवारी घडली.

पुणे : कोरेगाव पार्कमधील पुलावरुन नदीपात्रात मारली उडी ; अग्निशमन दलाकडून शोधमोहिम
( संग्रहित छायचित्र )

कोरेगाव पार्क भागातील पुलावरुन एकाने नदीपात्रात उडी मारल्याची घटना शनिवारी घडली. धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने पाण्यात उडी मारलेल्या व्यक्तीचा शोध लागला नाही.

कोरेगाव ते कल्याणीनगर दरम्यान असलेल्या पुलावरुन एकाने नदीत उडी मारल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे चार बंब आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा वेग जास्त असल्याने पाण्यात बुडालेली व्यक्ती वाहून गेला आहे. जवानांनी शोधमोहीम राबविली. मात्र, बुडालेल्या व्यक्तीचा ठावठिकाणा लागला नाही. उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दीपक केसरकरांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी