One was attacked with an ax after pelting a dog with a stone in Baner pune | Loksatta

पुणे: श्वानाला दगड मारल्याने एकावर कुऱ्हाडीने हल्ला; श्वानमालक अटकेत

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे: श्वानाला दगड मारल्याने एकावर कुऱ्हाडीने हल्ला; श्वानमालक अटकेत
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

पाळीव श्वानाला दगड मारल्याने झालेल्या वादातून एकावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची घटना बाणेर भागात घडली. या प्रकरणी श्वानाच्या मालकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. अयुब बाशा शेख (वय ३६, रा. शिंदे मळा, कपील मल्हार सोसायटीजवळ, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याने केलेल्या हल्ल्यात रवि घोरपडे (वय ४०, रा. शिंदे मळा, कपील मल्हार सोसायटीजवळ, बाणेर) गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा-पुणे: सिंहगड रस्ता भागात मोबाइल चोरट्यांची टोळी गजाआड

शेख बिगारी काम करतो. घोरपडे रंगारी आहे. दोघे शिंदे मळा भागातील वस्तीत राहायला असून एकमेकांचे परिचित आहेत. घोरपडे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिंदे मळा परिसरातून निघाला होता. त्यावेळी शेख याचे पाळीव श्वान घोरपडे याच्यावर भुंकले. घाेरपडेने श्वानाला दगड मारला. या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. शेखने घोरपडे याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. शेखने केलेल्या हल्ल्यात घोरपडे गंभीर जखमी झाला. खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेखला अटक करण्यात आली असून न्यायालयाने शेखला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 18:42 IST
Next Story
अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची निवड; प्रक्रिया न राबविता घोषणा केल्याचा आरोप