एमएचटी सीईटी परीक्षेमुळे राज्य मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ६, १० आणि १२ ऑगस्टला सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणारी परीक्षा आता २२, २३ आणि २४ ऑगस्टला घेण्यात येईल. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पुरवणी परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी परीक्षेचे अर्ज भरले आहेत.

मात्र सीईटी पुरवणी परीक्षेच्याच कालावधीत असल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल अंशत: बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आणि विषयांची माहिती राज्य मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येईल असे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.