पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी इथल्या ‘राज स्वीट मार्ट’दुकानाची तोडफो़ड केल्याप्रकरणी चार जणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीची वर्गणी कमी दिली म्हणून स्वीट मार्ट मध्ये काही टवाळखोरांनी धुडगूस घालत तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या असून सहा जण फरार आहेत त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. १०० नव्हे तर ५०० रुपये वर्गणी द्या म्हणून स्वीट मार्टमधील कर्मचाऱ्यांना मंगळवारी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी राहुल अरविंद गुप्ता यांनी या तक्रारदाराने बुधवारी गुन्हा दाखल केल्यावर प्रसाद राऊत, मणेश उर्फ मन्या कदम, माऊली उपल्ले, यश रसाळ यांना अटक करण्यात आली आहे. तर सुनील शेट्टीसह सहा जणांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही घटना घडत असतांना वाद सोडवण्यासाठी आलेल्या तक्रारदाराच्या आई वडिलांना देखील धक्काबुकी करण्यात आली. तुझ्या आई वडिलांना जीवे मारू अशी धमकी देत पुढील महिन्यापासून हप्ता द्यावा लागेल असं म्हणून आरोपी तिथून पसार झाले.हे. अशा प्रकारे वर्गणीच्या निमित्ताने दादगिरी करत असेल तर पोलिसात तक्रार करा, संबंधित व्यक्तीवर कारवाई करू असं आवाहन वाकडचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी नागरिकांना केलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri a gang ransacked a shop due to reduced dahi handi subscription kjp
First published on: 11-08-2022 at 20:21 IST