पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी येथे भर दिवसा अल्पवयीन मुलीचा हात पाय धरून अज्ञात मुलाने लग्नास मागणी घालत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. “माझ्या प्रेमाला होकार दिला नाहीस, तर मी माझे हात कापून घेईल” अशी धमकी दिली. ही घटना सांगवी परिसरात घडली असून घाबरलेली मुलगी घरी धाव घेतली. तेव्हा आरोपीने तिचा पाठलाग करत मुलीच्या वडिलांना धमकी देत, “मी मर्डर केले आहेत. तुमची वाट लावतो.”, अशी धमकी दिल्याच फिर्यादीमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी मेकअपचे साहित्य आणण्यासाठी क्रांती चौक येथे गेली होती. तेव्हा आरोपीने मुलीचे हात आणि पाय पकडून तू माझ्याशी लग्न कर,अन्यथा मी माझा हात कापून घेईल, अशी धमकी दिली. या घटनेमुळे पीडित मुलगी घाबरली होती. तिने मुलाच्या हाताला हिसका देऊन तिथून घरी पळून गेली. घरात जाताच वडील आणि आईला मुलीने रडत रडत सर्व प्रसंग सांगितला आणि तो माझा पाठलाग करत घराजवळ आल्याचं सांगितले. त्यानंतर वडिलांनी मुलीला छेडतो का असे म्हणून आरोपीला चोप दिला. दरम्यान, आरोपी निलेश ने दोन मित्रांना बोलावले. मी आताच जेलमधून सुटून आलो आहे. मी मर्डर केलेला आहे. मी कोयता घेऊन येऊन तुमची वाट लावतो अस म्हणत शिवीगाळ करत पीडित मुलीच्या वडिलांना धमकी दिली आहे.

या घटनेमुळे पीडित मुलीचे कुटुंब भीतीच्या सावटाखाली असून अद्याप आरोपी फरार आहे. त्याचा शोध सांगवी पोलीस घेत असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कविता रूपनर या करत आहेत. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad unidentified boy grabbed the hand of a minor girl rmt 84 kjp