पुणे : पुणे शहराचे माजी महापौर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय धनकवडे यांच्या पुण्यातील धनकवडी येथील बंगल्यासमोर एका महिलेने नारळ,लिंबू, काळा आभिर ठेवल्याची घटना घडली आहे. तसेच या घटनेप्रकरणी जादूटोणा विरोधी प्रतिबंधक अधिनियम २०१३ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवेक नामदेव पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मागील चार महिन्यापासून धनकवडी भागातील अनेक ठिकाणी अमावस्येच्या दिवशी अनेक घरासमोर एक महिला नारळ,दूध भात, उकडलेली अंडी,लिंबू,काळा आभिर ठेवून देत होती. तर असाच प्रकार शनिवारी २९ तारखेला अमावस्येच्या दिवशी दत्तात्रय धनकवडे यांच्या घरासमोर केला. तर या प्रकाराबाबत नागरिकांनी पोलिसांना कळविली, त्यानंतर त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या विरोधात सहकारनगर पोलिसांनी जादूटोणा विरोधी प्रतिबंधक अधिनियम २०१३ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्या महिलेकडे चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest woman for practicing witchcraft in front of former pune mayor dattatray dhankawades bungalow svk 88 mrj