बुलेट च्या आवाजावरून झाला होता वाद

पिंपरी चिंचवड: मोशी मध्ये दोन टोळक्यांनी काही वाहनांची तोडफोड  केली होती. याप्रकरणी भोसरी एम.आय.डी.सी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. नागरिकांमधील भीतीच वातावरण कमी करण्यासाठी या नऊ जणांची घटनास्थळावरून धिंड काढण्यात आली. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मोशी मध्ये दोन टोळक्यांमध्ये झालेल्या वादातून दोन ते तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलेट च्या आवाजावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झालं होतं. पैकी, काही जणांनी मोठा दगड घेऊन दुचाकी वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेनंतर भोसरी एम.आय.डी.सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अवघ्या काही तासांमध्ये आरोपींचा शोध घेऊन बेड्या ठोकल्या. आरोपींची घटनास्थळावरून धिंड काढण्यात आली.

कान पकडून त्यांना त्या परिसरातून पोलिसांनी माफी मागायला लावली. के.एस.बी चौकातील वाहन तोडफोड प्रकरणी भोसरी एम.आय.डी.सी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. के.एस.बी चौकात हॉटेल चालकाशी झालेल्या वादातून त्यांनी रस्त्याला पार्क केलेल्या काही वाहनांची तोडफोड केली होती. अवघ्या काही तासात त्यांना भोसरी एम.आय.डी.सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांना लक्ष केलं जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच मोठ नुकसान होताना दिसत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police parade 9 accused for vandalizing vehicles in moshi kjp 91 zws