समाजमाध्यमात झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन युवतीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉ. शुभंकर महापुरे (वय २६,रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी)  असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पं. सत्यशील देशपांडे यांना लतादीदी पुरस्कार जाहीर

पीडित युवती परगावची आहे. ती पुण्यात शिक्षणासाठी आली आहे. समाजमाध्यमातून त्याची युवतीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने युवतीला जाळ्यात ओढले. त्याने जेवणासाठी तिला नारायण पेठेतील कार्यालयात बोलावून घेतले. जेवण करण्यापूर्वी त्याने तिला मद्य पाजले. मद्य प्यायल्याने युवतीला गुंगी आली. त्यानंतर डॉ. महापुरे याने तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police registered case against doctor for raping college girl after friendship on social media pune print news rbk 25 zws