scorecardresearch

Premium

पं. सत्यशील देशपांडे यांना लतादीदी पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या वतीने प्रसिद्ध गायक आणि संगीत अभ्यासक पं. सत्यशील देशपांडे यांना पहिला लतादीदी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

pandit satyasheel deshpande, lata mangeshkar award, lata didi award, latadidi award declared to satyasheel deshpande
पं. सत्यशील देशपांडे यांना लतादीदी पुरस्कार जाहीर (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या वतीने प्रसिद्ध गायक आणि संगीत अभ्यासक पं. सत्यशील देशपांडे यांना पहिला लतादीदी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापुढे दरवर्षी एका कलाकाराला हा पुरस्कार दिला जाणार आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या ९४ व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात भारती मंगेशकर यांच्या हस्ते देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हेही वाचा : मिलिंद एकबोटे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा, महापालिकेसमोर प्रक्षोभक भाषण

lokrang 8
बहुआयामी कलाकाराचे चित्र-शब्द दर्शन
Waheeda Rehman conferred with Dadasaheb Phalke Award
दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेल्या वहिदा रेहमान यांनी त्यांच्या चित्रपटांत ‘भारतीय स्त्री’चे चित्रण कसे केले आहे?
Saleel Kulkarni
“हा मला एका महिन्यात मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार”; गायक सलील कुलकर्णींच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष
Centre announces top national science prize for young talent
लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराचे विजेते डॉ. अपूर्व खरे भटनागर पुरस्काराने सन्मानित

यानिमित्ताने आयोजित ‘असेन मी नसेन मी’ या लतादीदींनी गायलेल्या मराठी-हिंदी गीतांच्या कार्यक्रमात अवधुत गुप्ते, मोहन जोशी, आस्ताद काळे, अमृता सुभाष, विभावरी जोशी, मधुरा दातार, मनीषा निश्चल, केतन गोडबोले आणि राधा मंगेशकर यांचा सहभाग आहे. याच कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या अंतिम इच्छेनुसार मंगेशकर कुटुंबीयांच्यावतीने दीनानाथ रुग्णालयाला प्रदान करण्यात येणाऱ्या कृतज्ञता निधीचा धनादेश रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डाॅ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune latadidi award declared to pt satyasheel deshpande pune print news vvk 10 css

First published on: 25-09-2023 at 18:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×