पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन २१ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता गरवारे महाविद्यालयाच्या दृक्श्राव्य सभागृहात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : आचार्य अत्रे सव्वाशेव्या जयंती वर्षाच्या सांगतेनिमित्त चित्रपट महोत्सव, विशेष पुरस्कार वितरण

या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात प्रा. अविनाश सप्रे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. ‘समीक्षेच्या परिभाषेची समीक्षा’ या विषयावर ज्येष्ठ समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात डॉ. रुपाली शिंदे, डॉ. आशुतोष जावडेकर, डॉ. सुजाता शेणई सहभागी होणार आहेत. ‘समाजमाध्यमांवरील कला समीक्षा’ या विषयावरील परिसंवादात गणेश मतकरी, डॉ. वर्षा तोडमल, प्रसाद शिरगावकर, हिना खान सहभागी होणार आहेत. नव्या समीक्षेकडे या विषयावरील विनय हर्डीकर यांच्या व्याख्यानाने संमेलनाचा समारोप होणार आहे. असे प्रा. जोशी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Professor avinash sapre elected as chairman of samiksha sammelan pune print news vvk 10 css