पिंपरी- चिंचवड: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी सणानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी काही नवीन नाही. मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला जातो. परंतु, फटाक्यांच्या दुकानाच हटके आणि गुन्हेगारी पद्धतीने प्रमोशन करणे रिल्स स्टार ला महागात पडलं आहे. वाकड पोलिसांनी प्रोमोशन करणाऱ्या रिल्स स्टार ला पोलीस ठाण्यात आणून समज दिली आहे.

सध्या स्पर्धेच युग आहे, असं म्हणलं जात. कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं की जाहिरात आणि प्रोमोशन आलंच. दिवाळी काही दिवसांवर असल्याने अनेकांनी फटाक्यांची दुकानं थाटली आहेत. दुकानांच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रोमोशन केलं जातं आहे. इन्स्टग्राम हे प्रमोशन आणि जाहिरातीच माध्यम झालं आहे.

वाकडमधील तरुणाने फटाक्यांच्या दुकानाचे गुन्हेगारी पद्धतीने व्हिडिओ बनवून प्रोमोशन केलं. व्हिडिओ हिट झाला. व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहचला आणि वाकड पोलिसांनी संबंधित रिल्स स्टार ला पोलीस ठाण्यात आणून चांगली समज दिली आहे.

“रिल्स स्टार असलेल्या तरुणाने हात जोडून माफी मागितली. गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातलं जाईल असे व्हिडिओ कुणीही बनवू नयेत अस आवाहन केलं आहे.”

“गुन्हेगारीला कृत्याला खतपाणी घालणारे व्हिडिओ कुणीही बनवू नयेत. समाजात वेगळा ठसा उमटला जातो. असे प्रमोशन करू नये. व्हिडिओ बनवू नयेत.”- शत्रूघन माळी- वरिष्ठ पोलीस निरीक्षक