पुणे महापालिकेचे माजी गटनेते आणि भाजपाचे नेते गणेश बिडकर यांच्या शिरूर मधल्या फार्म हाऊसवर एका १२ वर्षी मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसानी कारवाही करत आरोपीला बेड्या ठोकल्यात मात्र हा प्रकार भाजपा नेत्याच्या फार्म हाऊसवर घडल्यामुळे, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्महाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेलअसे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव असुन आरोपीला शिक्रापुर पोलीसांनी अटक केली आहे.

..तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल – तृप्ती देसाईंचा इशारा

मात्र हा धक्कादायक प्रकार पुण्यातील भाजपाचे नेते गणेश बिडकर यांच्या मालकीची फार्महाऊसवर घडला असून, त्यामुळे याची चर्चा कुठं होऊ नये म्हणून हे प्रकरण दाबलं जाण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. अशाप्रकारच्या अनेक तक्रारी देखील माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यामुळे माझी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की या अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला पाहिजे. हे प्रकरण तातडीन जलगती न्यायालयात चालवलं गेलं पाहिजे. जरी गणेश बिडकर यांचा या प्रकरणाशी संबंध नसला तरी हे फार्महाऊस त्यांच्या मालकीचं आहे, म्हणून याची जर चर्चा कुठं होऊ नये म्हणून प्रकरण दाबलं जाणार असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.

पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्यांच्याच नात्यातील असणाऱ्या विशालने पीडित मुलीला फार्महाऊसच्या मागील बाजूस असणाऱ्या मजुर खोल्यांच्या मागे नेले आणि तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune a minor girl was raped at the farmhouse of the former group leader of the municipal corporation accused in custody msr