पुणे : शहरात वाढत्या उन्हाबरोबरच पाण्याची मागणी वाढली असून, टँकरच्या फेऱ्यांत वाढ झाली आहे. मार्च महिन्यात शहरात टँकरच्या ४७ हजार ८९६ फेऱ्या झाला आहेत. ही संख्या फेब्रुवारीमध्ये ३८ हजार ५२२ होती. एप्रिल आणि मे महिन्यात पालिका प्रशासनास शहराला पुरेसे पाणी देण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्च महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. काही दिवस तापमान ४० अंशांजवळ होते. वाढत्या उन्हाबरोबरच या महिन्यात जलवाहिन्या फुटणे, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. परिणामी पाणी नसलेल्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. शहरात जानेवारी २०२५ पासून प्रत्येक महिन्यात टँकरच्या मागणीत सरासरी ३ ते ४ हजारांची वाढ होत आहे. मात्र, मार्च महिन्यात ही संख्या १० हजारांनी वाढली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये शहरात सुमारे ३६ हजार ५९१ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. हा आकडा जानेवारी २०२५ मध्ये ३९ हजार ६९२ पर्यंत गेला होता.

फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा आकडा ३८ हजार ५२२ फेऱ्यांपर्यंत आला. मात्र, मार्च महिन्यात यात मोठी वाढ झाल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील दोन महिन्यांत यामध्ये अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.

वर्षभरात ४ लाख ८८ हजार फेऱ्या

शहरात गेल्या वर्षभरात टँकरच्या ४ लाख ८८ हजार फेऱ्या झाल्या आहेत. हा आकडा गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. २०२२-२३ मध्ये टँकरच्या फेऱ्या ३ लाख ५४ हजार झाल्या होत्या, २०२३-२४ मध्ये ४ लाख ३४८ फेऱ्या झाल्या होत्या. मात्र, यंदाच्या वर्षी टँकरच्या फेऱ्यांची संख्या तब्बल ८८ हजारांनी वाढली असल्याचे समोर आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city water tanker demand increased due to water shortage pune print news css