पुणे : सायबर चोरट्यांनी घरातून कामाची संधी असे आमिष दाखवून तरुणाची २४ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कोंढवा परिसरातील येवलेवाडी भागात राहायला आहे. चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. घरातून कामाची संधी असे आमिष चोरट्यांनी संदेशाद्वारे दाखविले होते. चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला तरुणाला ऑनलाइन पद्धतीने काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाला पैसे दिले. पैसे मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला आणखी पैसे जमा करण्यास सांगितले. या कामात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाकडून वेळोवेळी पैसे घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणाला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अब्दुल रऊफ शेख तपास करत आहेत. ऑनलाइन टास्क, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune cyber crime youth lost 25 thousand in online task investment returns fraud pune print news rbk 25 css