पुणे : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाला विक्रमी संख्येने पर्यटकांची भेट | Pune People visited Rajiv Gandhi Zoological Park in record number pune print news scsg 91 | Loksatta

पुणे : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाला विक्रमी संख्येने पर्यटकांची भेट

शहरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर १४ मार्च रोजी उद्याने आणि प्राणीसंग्रहालय खुले करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला.

पुणे : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाला विक्रमी संख्येने पर्यटकांची भेट
Rajiv Gandhi Zoological Park : विक्रमी संख्येने पुणेकरांनी प्राणीसंग्रहालयाला दिली भेट (फोटो सौजन्य: पवन खेंगरे)

शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विक्रमी संख्येने पर्यटकांनी कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाला (Rajiv Gandhi Zoological Park) रविवारी (५ जून) भेट दिली. रविवारी दिवसभरात तब्बल २४ हजार पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. यंदाच्या सुट्टीतील पर्यटकांची ही विक्रमी संख्या असून गेल्या रविवारी वीस हजार पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली होती.

शहरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर १४ मार्च रोजी उद्याने आणि प्राणीसंग्रहालय खुले करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. प्राणीसंग्रहालय खुले करण्यात आल्यानंतर पहिल्या दिवशी तब्बल १४ हजार पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली होती.

शाळांना सुटी लागल्यानंतर लहान मुलासंह आबाल वृद्धांची गर्दी प्राणीसंग्रहालयात सुरू झाली. १५ मे रोजी २२ हजार १८२ पर्यटकांनी प्राणी संग्रहालायाला भेट दिली होती. त्यानंतर गेल्या रविवारी २९ मे रोजी २० हजाराहून अधिक पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली होती. त्यानंतर उच्चांक रविवारी (५ जून) झाला. रविवारी २४ हजाराहून अधिक पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली, अशी माहिती कात्रज प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख डॉ. राजकुमार जाधव यांनी दिली. रविवारी दुपारपर्यंत पर्यटकांच्या रांगा प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारा समोर लागल्या होत्या.

करोना संसर्गामुळे दोन वर्षे प्राणीसंग्रहालाय बंद होते. या प्राणीसंग्रहालयात सिंह, शेकरू, वाघाटी मांजर आदी नवे प्राणी आहेत. वाघ, बिबट्या, हरीण, गवा, लांडगा, कोल्हा, अस्वल, हत्ती बरोबरच चौशिंगा आणि तरस आदी प्राणी पर्यटकांना या प्राणीसंग्रहालयात पहाता येतात. येत्या काही काळात झेब्रा आणि अन्य काही प्राणी प्राणीसंग्रहायायात आणण्याचे विचाराधीन आहे. प्राणीसंग्रहालाय बंद होते, त्या कालावधीत नव्या प्राण्यांसाठी खंदक तयार करण्यात आले आहेत. प्राणीसंग्रहालयात विविध विकासकामेही प्रगतीपथावर आहेत.

कात्रज येथील प्राणीसंग्रहालय आणि सर्पोद्यान देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून प्राणी हस्तांतरण प्रक्रिया प्रशासनाकडून राबविली जात आहे. शेकरू, जंगल कॅट, लेपरड कॅट आदी प्राणी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2022 at 10:55 IST
Next Story
‘नॅक’च्या मूल्यांकन प्रक्रियेत बदल प्रस्तावित ; श्वेतपत्रिकेवर हरकती-सूचना नोंदवण्यासाठी १५ जूनची मुदत