पुण्यातील एका रिक्षा चालकाला प्रवासी तरुणीने ऑनलाइन गुगल पे द्वारे पेमेंट केले होते.त्या चालकाने त्याचा गैरफायदा घेऊन संबंधित तरुणीला त्या नंबरवर फोन करून अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही वाघोली ते विमाननगर असा रिक्षातुन प्रवास केला होता.त्यावेळी त्या तरुणीने रिक्षाचे २० रुपये भाडे गगुल पे व्दारे केले.यामुळे तिचा मोबाईलनंबर हा रिक्षा चालकाकडे गेला.त्यानंतर रिक्षा चालकाने तिच्या मोबाईलवर अश्‍लिल व्हिडिओ आणि मेसेज पाठवले. यानंतर आरोपी रिक्षा चालकाने व्हिडिओ कॉल करुन अश्‍लिल बोलण्याचा प्रयत्न केला.

तसेच त्याचा अश्‍लिल फोटोही त्याने तरुणीला पाठवला.हे घडल्यानंतर पीडित तरुणीने आरोपीचा नंबर ब्लॉक केल्यावर त्याने दुसऱ्या मोबाईलवरुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू केला.या प्रकरणी पीडित तरुणीने हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.