पुणे : लेखन, संकलन, संपादन असे साहित्य प्रकार लीलया हाताळून अभिवाचनाच्या माध्यमातून अभिजात साहित्याच्या प्रचारामध्ये योगदान देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका डॉ. वीणा देव (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्या ज्येष्ठ लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. त्यांच्यामागे प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोनीदा यांच्यामुळे वीणा देव यांच्यावर घरातच मराठी भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले. शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी ३२ वर्षे अध्यापन कार्य केले. विभागप्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. ‘मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. संपादन केली होती.

हेही वाचा…बुलेट घसरून युवकाचा मृत्यू; आठवडभरात दुसरा बुलेट अपघात

पती डॉ. विजय देव, मृणाल आणि मधुरा या कन्या आणि जावई रुचिर कुलकर्णी यांच्यासमवेत वीणा देव यांनी गो. नी. दांडेकर यांच्या कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे साडेसहाशेहून अधिक प्रयोग केले. गोनीदा यांच्या स्मरण जागरणासाठी त्याबबी मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन असे उपक्रम राबविले होते. मृण्मयी प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी गोनीदा यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केल्या होत्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune senior marathi writer dr veena dev passed away on tuesday pune print news vvk 10 sud 02