पुणे : येरवड्यातील महिलेचा खून प्रकरणाचा उलगडा; कचरा वेचक अटकेत

कचरा वेचकाकडून महिलेवर बलात्कार

पुणे : येरवड्यातील महिलेचा खून प्रकरणाचा उलगडा; कचरा वेचक अटकेत
( संग्रहित छायचित्र )

पुण्यातील येरवडा भागातील पर्णकुटी पायथा परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. या प्रकरणी एका कचरावेचकास अटक करण्यात आली असून त्याने महिलेवर बलात्कार करुन तिचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे.

सतिष संतोष हारवडे (वय ४५, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. येरवड्यातील पर्णकुटी पायथा भागातील झुडपात एका महिलेचा मृतदेह आठवड्यापूर्वी सापडला होता. मृतदेह सडलेला होता. त्यामुळे महिलेची ओळख पटविण्यात अडचण आली होती. घटनास्थळी पोलिसांना टोपी आणि चप्पल सापडली होती. महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे आदेश दिले होते.

सीसीटीव्ही चित्रीकरणात घटनास्थळापासून काही अंतरावर दिसून आला कचरा वेचक –

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, उपनिरीक्षक अंकुश डोंबळे, पोलीस कर्मचारी अनिल शिंदे, कैलास डुकरे, गणपत थिकोळे, सूरज ओंबासे आदींनी तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातीली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात घटनास्थळापासून काही अंतरावर टोपी घातलेली व्यक्ती कचरा वेचत असल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी भंगार माल खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांकडे चौकशी सुरू केली. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हारवडे नदीपात्रातील चिमा घाट परिसरात एका बाकावर झोपल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने महिलेवर बलात्कार करुन खून केल्याची कबुली दिली, असे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune the case of murder of a woman in yerawada solved garbage picker arrested pune print news msr

Next Story
पिंपरी-चिंचवड : …म्हणून अभिनेत्री आर्या घारे हिने चक्क स्मशानभूमीत साजरा केला स्वत:चा वाढदिवस..!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी