पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी पश्चिम मार्गाचे फेरमूल्यांकन पूर्ण झाले आहे. त्यानंतर रस्त्याच्या पश्चिम भागातील मार्गाची दर निश्चिती करण्यात आली. त्यामुळे पुढील काही दिवसांत पश्चिम भागातून रस्ता जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला आणि जमीन ताब्यात घेण्याबाबत नोटीस देण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून १७२ किलोमीटर आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व मार्ग मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांतून प्रस्तावित आहे, तर पश्चिम मार्ग भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळमधील सहा गावांतून जाणार आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी २६ हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा >>> पुणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीमुळे परदेशी नागरिकाला असा मिळाला दिलासा!

या प्रकल्पासाठी मूल्यांकन प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, जमिनींचे मूल्यांकन गेल्या तीन वर्षांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार गृहीत धरून करण्यात आले. करोना काळात वर्तुळाकार रस्ता जाणाऱ्या बहुतांश गावांत खरेदी-विक्रीचे व्यवहार अत्यल्प झाले. परिणामी प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनींचा दर कमी होत असल्याचा आक्षेप स्थानिकांनी घेतला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहारांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पश्चिम भागातील बहुतांश सर्व गावांचे फेरमूल्यांकन पूर्ण करण्यात आले असून, पूर्व भागातील काही गावांचे फेरमूल्यांकन अद्याप बाकी आहे.

हेही वाचा >>> तीन दिवस उष्णतेच्या लाटा; विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात तापमानवाढीचा हवामान विभागाचा अंदाज

‘वर्तुळाकार रस्त्याच्या पश्चिम मार्गाचे फेरमूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे, तर पूर्व भागाचे काम अंतिम टप्प्यात आहे. फेरमूल्यांकनानुसार प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या मोबदल्याचे तक्ते अद्ययावत करण्यात येत आहेत. त्यानंतर पुन्हा मान्यता घेऊन प्रकल्पग्रस्तांना किती जमीन संपादित केली जाणार आहे, त्याचा मोबदला किती मिळेल, याबाबतची नोटीस पाठविण्यात येईल. या प्रकल्पाबाबतच्या बैठकीत पश्चिम भागाची दरनिश्चितीबाबत चर्चा झाली. बैठकीचे इतिवृत्त अंतिम करून आठ दिवसांत दरनिश्चित केली जाईल,’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे: सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

जूनअखेरपासून भूसंपादन नोटीस

जूनअखेरपासून प्रकल्पग्रस्तांना किती जमीन संपादित केली जाणार आहे, त्याचा मोबदला किती मिळेल, याबाबतची नोटीस पाठविण्यात येईल. त्यानंतर आठ ते पंधरा दिवसांच्या कालावधीत मान्यता असल्यास संबंधितांकडून, तसेच लिखित स्वरूपात घेऊन तातडीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येईल. स्वत:हून जमीन देणाऱ्यांना अतिरिक्त मोबदला दिला जाणार आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune traffic jam circular road project land possession pune print news psg 17 ysh