महाराष्ट्र राज्य वीज वितरण आणि पारेषण कंपनीच्या कामासाठी पर्वती जलकेंद्र आणि लष्कर जलकेंद्र येथील विद्युत आणि पंपिंग, स्थापत्य विषयक तातडीचे काम गुरुवारी (४ ऑगस्ट) करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन जलकेंद्र अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (५ ऑगस्ट) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, कोथरूड परिसर, डहाणूकर कॅालनी, कर्वेनगर, विधी महाविद्यालय रस्ता, मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाब नगर, कोंढवा खुर्द या पर्वती जलकेंद्राअंतर्गत भागात गुरुवारी पाणी येणार नाही.

लष्कर, पुणे रेल्वे स्थानक परिसर, मुळा रस्ता, कोरेगांव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॅालनी, वडगांवशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी या लष्कर जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune water supply to eastern part including petha kothrud karvenagar was shut down on thursday pune print news msr