भामा-आसखेड अखत्यारित पंपिंग स्थानकात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून तातडीने देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्यामुळे पूर्व भागाचा काही ठिकाणचा पाणीपुरवठा रविवारी (११ सप्टेंबर) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (१२ सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : पीएमपी प्रवासी महिलेचा ७५ हजारांचा ऐवज लंपास

लोहगांव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खळस, धानोरी या भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune water supply to lohgaon vimannagar areas will be closed on sunday pune print news amy