पुणे : घरकामाच्या बहाण्याने चोरी महिलेसह साथीदार अटकेत

पावणेतेरा लाखांचे दागिने जप्त

पुणे : घरकामाच्या बहाण्याने चोरी महिलेसह साथीदार अटकेत
( संग्रहित छायचित्र )

घरकाम करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून ऐवज लांबविणाऱ्या महिलेसह साथीदाराला गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून पावणेतेरा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

घरकामाच्या बहाण्याने ज्येष्ठाच्या घरी नोकरीस राहून त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या बंटी-बबलीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल पावणे तेरा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रेखा राहुल क्षीरसागर (वय ३०, रा. वानवडीगाव), ऋषभ विनोद जाधव (रा. रामटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्वारगेट परिसरातून एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून आरोपींनी दागिने लांबविले होते. घरकाम करण्याच्या बहाण्याने त्यांनी चोरी केली होती. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघे जण स्वारगेट परिसरातील नटराज हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पावणेतेरा लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, उज्वल मोकाशी, उत्तम तारु, गजानन सोनुने, साधना ताम्हाणे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
वारज्यातील प्रस्तावित रुग्णालयाला काँग्रेसचा विरोध
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी