पुणे : महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू| Pune Youth dies after drowning in Katraj lake pune print news amy 95 | Loksatta

पुणे : महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

कात्रज तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी पांचाळ आणि त्याचे मित्र रविवारी सकाळी निघाले होते.

पुणे : महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
संग्रहित छायाचित्र

कात्रज तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ज्ञानेश्वर शिवाजी पांचाळ (वय २३, रा. कात्रज) असे मरण पावलेल्या तरुणाच्या नाव आहे.

हेही वाचा >>>लष्करी जवानाच्या घरातून पावणेतीन लाखांचा ऐवज लांबविला

कात्रज तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी पांचाळ आणि त्याचे मित्र रविवारी सकाळी निघाले होते. त्याचे मित्र बोटीतून तेथे गेले. मात्र, पांचाळने पोहोत जाण्याचा निर्णय घेतला. पोहताना त्याची दमछाक झाली आणि तो पाण्यात बुडाला. पांचाळच्या मित्रांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पांचाळचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

हेही वाचा >>> पिंपरी चिंचवड : शंभर खोके मातोश्री ओके , ठाकरे- पवार चोर है अशा घोषणा देत वेदांता- फॉक्सकॉनवरून भाजप आक्रमक

कात्रज तलाव परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने दुर्घटना घडली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पिंपरी चिंचवड : शंभर खोके मातोश्री ओके , ठाकरे- पवार चोर है अशा घोषणा देत वेदांता- फॉक्सकॉनवरून भाजप आक्रमक

संबंधित बातम्या

Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय
पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे आभासी चलनाद्वारे आठ कोटी ३० लाखांची खंडणीची मागणी
पुणे: श्वानाला दगड मारल्याने एकावर कुऱ्हाडीने हल्ला; श्वानमालक अटकेत
प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी पिंपरीत सभा
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मियां-बीबी राजी तो…, लांबचा मुहूर्त धरला म्हणून पठ्ठ्याने होणाऱ्या बायकोलाच पळवलं
हिरव्या मिरच्यांचे सेवन आरोग्यासाठी ठरेल वरदान! तज्ज्ञांकडून जाणून घ्या खाण्याची योग्य मात्रा
“मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास…”, गुलाबराव पाटील संतप्त
बाप तो बापच! झोपलेला मुलगा खाली पडू नये म्हणून या माणसाने काय केले पाहा
“कियारा डुप्लिकेट विकी कौशल मात्र…” श्रेया बुगडेच्या पोस्टने वेधलं लक्ष