पुणे : पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांना दाखवण्यास जिल्हा परिषदेला अखेर ग्रामपंचायत मिळाली. शुक्रवारी कुमार यांनी जिल्हा परिषदेसह हवेली तालुक्यातील शिंदवणे ग्रामपंचायतीला भेट देऊन आढावा घेतला. गुरूवारी जिल्हा परिषद प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली होती, त्यानंतर शुक्रवारी अखेर जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत सचिवांना दाखवण्यास मिळाली.
जिल्हा परिषदेला सकाळी भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामनिहाय आढावा घेतला. कामाच्या प्रगतीची माहिती घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक कामांचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर निर्णयासाठी प्रलंबित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर कोण कुणाचा आढावा घेत आहे, असा प्रश्न कुमार यांनी केल्यावर अधिकारी निरूत्तर झाले.दरम्यान, जिल्हा परिषदेला भेट दिल्यानंतर त्यांनी मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. त्याचबरोबर हवेली तालुक्यातील शिंदवणे ग्रामपंचायतला जाऊन प्रत्यक्षात काम कसे चालते याची माहिती घेतली. राजेश कुमार यांचा पुणे जिल्हा परिषदेतील दौरा चांगला गाजला आहे.

हेही वाचा : धक्कादायक! गाडी बाजूला घेण्यास सांगितल्यामुळे पीएमपीएमएलच्या बस चालकाला बेदम मारहाण

कारण ऐनवेळी दौरा आल्याने जिल्हा परिषदेची तयारी नव्हती. त्यांना काय दाखवायचे यासाठीची शोधाशोध गुरूवारी उशिरापर्यंत सुरू होती. कारण चांगल्या ग्रामपंचायती, चांगले काम करणारे बचत गटाची माहितीच प्रशासनाला उपलब्ध होत नव्हती. अखेर एक ग्रामपंचायत मिळाल्याने अधिकाऱ्यांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला. शनिवारी कुमार हे भोर आणि मावळ तालुक्यात भेटी देणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune zilla parishad finally got the gram panchayat to show the upper chief secretary pune print news tmb 01