Rape of girl preparing for competitive exam pune | Loksatta

पुणे: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीवर बलात्कार; आरोपीस अटक

आरोपीचे दोन विवाह झाले आहेत. तरीही त्याने पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीवर बलात्कार; आरोपीस अटक
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

विवाहाचे आमिष दाखवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीवर बलात्कार केल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. सोमनाथ संभाजी कोद्रे (वय ३८, रा. मातोश्री बिल्डिंग, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका युवतीने फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- पुणे: नायडू रुग्णालयात गोवर आजारासाठी विलगीकरण कक्ष; ५० खाटांची सुविधा

पीडित युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करते. युवती सदाशिव पेठेत एका सदनिकेत भाडेतत्वावर राहायला आहे. काही दिवसांपूर्वी युवतीने एका ॲपच्या माध्यमातून नोकरीविषयक अर्ज केला होता. या ॲपच्या माध्यमातून पीडित युवतीची कोद्रेशी ओळख झाली. कोद्रे विवाहित आहे. त्याचे दाेन विवाह झाले आहेत. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहाच्या आमिषाने त्याने युवतीवर बलात्कार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक मुळुक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 16:26 IST
Next Story
पुणे: नायडू रुग्णालयात गोवर आजारासाठी विलगीकरण कक्ष; ५० खाटांची सुविधा