Rickshaw drivers strike in Pune is finally over | Loksatta

बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन; पुण्यातील रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे

पुणे शहरात ओला, उबरसहॲपच्या माध्यामातून दुचाकी टॅक्सी सेवा बंद करण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालकांनी बंद पुकारला होता

बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन; पुण्यातील रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे
पुण्यातील रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे

बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पुण्यातील रिक्षाचालकांनी सोमवारी बंद मागे घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांनी आंदोलनस्थळी येऊन रिक्षाचालकांची भेट घेतली. त्यावेळी कोलते यांनी आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांनी संप मागे घेतला. परंतु, १० डिसेंबरपर्यंत बाईक टॅक्सी ॲप बंद झाले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रिक्षाचालकांनी दिला आहे.

हेही वाचा- निधीअभावी पुणे जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक अभिलेख कक्षाचे काम रखडले

शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या दुचाकी टॅक्सीवर बंदी घालण्याच्या प्रमुख मागणीसाठी शहरातील रिक्षा संघटनांनी सोमवारी मोठ्या संख्येने मोर्चा काढून बंद पुकारला होता. दिवसभर शहरातील बहुतांश रिक्षा बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. रिक्षा चालकांच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय होईपर्यंत बंद कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलनात सहभागी रिक्षा संघटनांकडून व्यक्त करण्यात आला होता. अखेर हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासनानंतर रिक्षाचालकांनी बंद मागे घेतला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 22:57 IST
Next Story
अकृषक प्रस्ताव मंजुरीसाठी ४२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी; तीन तहसीलदार, दोन दलालांविरुद्ध गुन्हा