नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथे बिबट्याच्या हल्ल्यात सिद्धार्थ प्रवीण केदार या सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने ग्रामस्थ व मुलाच्या कुटुंबीयांनी प्रचंड संताप व्यक्त करत मुलाचा मृतदेह वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यास विरोध केला ही घटना बुधवारी ( दि. २४ सप्टेंबर ) घडली .
ग्रामस्थांनी दिलेल्या माहिती नुसार , सिद्धार्थ हा अभ्यास करण्यासाठी घराच्या बाहेर बसला असताना बिबट्याने त्याला उचलून नेल्याची घटना काही आजूबाजूच्या लोकांनी पाहिली. यानंतर लोकांनी आरडओरडा केला मात्र बिबट्या मुलाला घेऊन गेला.यानंतर पालकांनी व ग्रामस्थांनी सिद्धार्थचा शोध सुरू केला . या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली . वन विभागाचे अधिकारी तिथे आले असताना ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत मुलाचा मृत्यूदेह वनविभागाच्या अधिकांराच्या ताब्यात देण्यात त्यांनी विरोध दर्शविला. स्थानिक ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त करत आक्रमक झाले होते . बिबट्याचा प्रश्न कायम स्वरूपी कधी सोडविणार याची लेखी हमी द्या अशी मागणी करत आक्रमक झाले होते.