पुणे शहरातील तहसील कार्यालय़ातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रशासनामार्फत हटवण्यात आल्याची घटना घडली.त्या घटनेच्या निषेधार्थ पुणे शहरातील विविध शिवप्रेमी संघटनांनी तहसील कार्यालय़ येथे दुपारी दोन वाजल्यापासून ठिय्या आंदोलन केले.यावेळी राज्य सरकार आणि प्रशासना विरोधात जोरदार घोषणा करण्यात आली.शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके हे पुणे दौर्‍यावर असताना.त्या आंदोलनाबाबत निलेश लंके यांना माहिती मिळताच, तहसील कार्यालय़ येथील आंदोलनामध्ये निलेश लंके हे सहभागी होऊन,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा,अशी मागणी देखील त्यांनी केली.त्यानंतर शिवप्रेमी अधिक आक्रमक झाल्यानंतर अधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा तहसील कार्यालय़ येथे आणला.त्यावेळी असंख्य शिवप्रेमीनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक घातला.

त्यावेळी प्रांताधिकारी यशवंत माने म्हणाले,नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे.येत्या कालावधीमध्ये ती इमारतीमध्ये कामकाज सुरू होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढून त्या ठिकाणी बसविण्यात येणार असल्याने,प्रशासकीय सर्व परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा काढण्यात आला.मात्र आज सकाळपासून शिवप्रेमीनी तीव्र भावना व्यक्त केल्या.त्यानंतर वरिष्ठ अधिकारी वर्गा सोबत चर्चा करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तहसील कार्यालय़ येथे आणण्यात आला असून पुनर्स्थापित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.