परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा;  विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचा निर्णय

विद्यापीठाकडून उन्हाळी सत्राची परीक्षा सध्या सुरू आहे. मात्र काही विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाले असल्याने त्यांना त्यांच्या स्पर्धा किंवा उपक्रमांमुळे विद्यापीठाची परीक्षा देणे शक्य नाही.

(संग्रहीत छायाचित्र)

पुणे : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये सहभागी होणारे, विद्यापीठाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची पर्यायी व्यवस्था म्हणून विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने घेतला. विशेष परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे अर्ज करण्याच्या सूचना विद्यापीठाने सोमवारी दिल्या.

विद्यापीठाकडून उन्हाळी सत्राची परीक्षा सध्या सुरू आहे. मात्र काही विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाले असल्याने त्यांना त्यांच्या स्पर्धा किंवा उपक्रमांमुळे विद्यापीठाची परीक्षा देणे शक्य नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या विषयांच्या परीक्षा संपल्यानंतर विशेष परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. सध्याची परीक्षा संपल्यानंतर पुढील दहा दिवसांच्या आत प्राचार्यांनी पर्यायी परीक्षेसाठी आलेले अर्ज विद्यापीठाकडे पाठवण्याबाबत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. महाविद्यालयांकडून विद्यापीठाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यानंतर अर्जांची छाननी करून विशेष परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेस बसण्याची संधी दिली जाईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. महाविद्यालयांनी पर्यायी परीक्षेसंदर्भातील सूचना महाविद्यालयामध्ये दर्शनी परिसरात लावण्याच्या सूचनाही विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत.

पर्यायी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी

– राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू

– राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्य सहभागी झालेले विद्यार्थी.

– सीए, सीएस, एमपीएससी, युपीएससी परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास या परीक्षा देणारे विद्यार्थी

– इंद्रधनुष्य, आविष्कार, अश्वमेघ या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी – समकक्ष विषय आणि इतर कारणांमुळे एकाच दिवशी, एकाच वेळी दोन विषयांची परीक्षा असल्यास – सीईटी, नेट, सेट, सीएमए, सीए, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षा एकाच दिवशी असल्यास.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Special exams students board examinations assessment university pune print news ysh

Next Story
सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी