पुणे : ‘जी-२०’ डिजिटल अर्थव्यवस्था विषयक कृतिगटाच्या तिसऱ्या बैठकीचा बुधवारी समारोप झाला. या तीन दिवसीय बैठकीत जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) शिखर परिषद आणि जागतिक डीपीआय प्रदर्शन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक डीपीआय शिखर परिषदेला जगभरातील ५० देशांतून आलेल्या सुमारे दीडशे परदेशी प्रतिनिधींसह एकूण अडीचशेहून अधिक प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते. दोन हजारांहून अधिक व्यक्तींनी ऑनलाइन पद्धतीने या परिषदेत भाग घेतला. या शिखर परिषदेमध्ये, भारताने ‘इंडिया स्टॅक’ अर्थात लोकसंख्येच्या प्रमाणात लागू करण्यात आलेल्या यशस्वी डिजिटल उपाययोजना सामायिक करण्यासंदर्भात आर्मेनिया, सिएरा लिओन, सुरीनाम आणि अँटिग्वा तसेच बार्बुडा या देशांशी सामंजस्य करार केले.

आणखी वाचा-रेल्वेचा उलटा प्रवास! स्वयंचलित यंत्रणेऐवजी आता कर्मचाऱ्यांवर भिस्त

या शिखर परिषदेने क्षेत्र निरपेक्ष (पायाभूत) आणि क्षेत्रीय डीपीआय यावर आधारित चर्चांसाठी जागतिक मंच उपलब्ध करून दिला. यामध्ये सहभागी झालेल्या डीपीआयशी संबंधित जागतिक पातळीवरील ६० तज्ज्ञांनी इतर अनेक महत्त्वाच्या विषयांसह, नेतृत्व, धोरण आणि व्यवसायी पातळीवरील भविष्याला आकार देणारे विचारमंथन केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Step towards digital economy memorandum of understanding with this countries pune print news stj 05 mrj