हडपसरमधील फुरसुंगी परिसरात टोळक्याने घरे, गाड्यांवर दगडफेक करुन दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने एकाला तलवारी, कोयते उगारुन जीवे मारण्याची धमकी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे : खडकीमधील श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी चोरणारा तरुण अटकेत

या प्रकरणी ऋषभ हिवाळे (रा. काळेपडळ, हडपसर), रोहन कुदळे, अस्लम शेख, विक्रम जगधने, अक्षय कोळी, पवन भारती (रा. तरवडे वस्ती, महमदवाडी, हडपसर) यांच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर गुंडिबा कांबळे (वय ४३, रा. संकेत विहार, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. आरोपी हिवाळे, कुदळे, शेख, जगधने, कोळी, भारती आणि साथीदारांनी फुरसुंगीतील ढेरे कंपनीजवळ कांबळे यांना अडवले. त्यांना तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. टोळक्याने परिसरातील घरे तसेच गाड्यांवर दगडफेक केली. कांबळे यांच्या मुलावर टोळक्याने कोयता उगारुन दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक भैरव शेळके तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stone pelting on houses and cars by koyta gang in fursungi pune print news rbk 25 dpj