लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मुंढव्यात कोयता गँगने एका व्यावसायिकाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच पानपट्टी चालकाने उधारीवर सिगारेट न दिल्याने त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सीताराम साठे (वय २१,रा. मांजरी) याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साठे याची मुंढवा भागातील केशवनगर परिसरात पानपट्टी आहे. आरोपी साठे याच्या पानपट्टीवर सिगारेट घेण्यासाठी अल्पवयीन मुले यायची. त्यांनी साठे याच्याकडून ते सिगारेट घ्यायचे. उधारीवर सिगारेट न दिल्याने अल्पवयीन मुले आणि साथीदारांनी साठे याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.