पुणे : पुणे विमानतळावरील नवीन कार्गो टर्मिनलचे काम पूर्ण होऊनही त्याच्या उद्घाटनात लालफितीचा अडसर निर्माण झाला आहे. नागरी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाने मंजुरी दिली नसल्याने टर्मिनल सुरू झालेले नाही. मागील सात महिन्यांपासून पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय मालवाहतूक बंद असल्याचा फटका व्यवसायांना बसत आहे. त्यामुळे टर्मिनल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
पुणे विमानतळावर नवीन कार्गो टर्मिनलची उभारणी करण्यात आली आहे. मागील सात महिन्यांपासून कार्गो टर्मिनल नसल्याने व्यवसायांना त्यांचा माल परदेशात पाठवायचा झाल्यास तो मुंबईतून पाठवावा लागत आहे. नागरी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाने जानेवारी महिन्यात पुणे विमानतळावरील मालवाहतूक सुविधा बंद करण्याचा आदेश दिला होता. मालवाहतूक सुविधेतील पायाभूत सुविधांमध्ये असलेल्या त्रुटी याला कारणीभूत ठरल्या होत्या. याचबरोबर अनेक निमयांचे पालन केले नसल्याने ही सुविधा बंद करण्यात आली होती. नंतर स्पाईसजेट आणि इंडिगो या कंपन्यांना देशांतर्गत मालवाहतुकीस परवानगी देण्यात आली. मात्र, आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीस अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.पुणे विमानतळावर नवीन कार्गो टर्मिनलची उभारणी करण्यात आली आहे. मागील सात महिन्यांपासून कार्गो टर्मिनल नसल्याने व्यवसायांना त्यांचा माल परदेशात पाठवायचा झाल्यास तो मुंबईतून पाठवावा लागत आहे. नागरी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाने जानेवारी महिन्यात पुणे विमानतळावरील मालवाहतूक सुविधा बंद करण्याचा आदेश दिला होता. मालवाहतूक सुविधेतील पायाभूत सुविधांमध्ये असलेल्या त्रुटी याला कारणीभूत ठरल्या होत्या. याचबरोबर अनेक निमयांचे पालन केले नसल्याने ही सुविधा बंद करण्यात आली होती. नंतर स्पाईसजेट आणि इंडिगो या कंपन्यांना देशांतर्गत मालवाहतुकीस परवानगी देण्यात आली. मात्र, आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीस अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
हेही वाचा >>>पिंपरी: ‘दादा’ मंत्र्यांचा तोंडी आदेश; अतिरिक्त आयुक्त पदभारापासून वंचित
नागरी हवाई वाहतूक विभागाची मंजुरी अद्याप नवीन कार्गो टर्मिनलला मिळाली नसल्याचे पुणे विमानतळाचे संचालक अजय ढोके यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवीन कार्गो टर्मिनलला नुकतीच भेट दिली. त्यांनी टर्मिनलची तपासणी केली आहे. त्यांच्याकडून अद्याप टर्मिनलला मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्यानंतर टर्मिनल सुरू केले जाणार आहे.
हेही वाचा >>>पिंपरी: सनदी लेखापालाने मैत्रिणीमार्फत रचलेला भागीदाराच्या खुनाचा कट ‘असा’ झाला उघड
पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख हवाई मालवाहतूक केंद्र आहे. पुण्यातील आंतरराष्ट्रीय मालवाहतूक बंद असल्याने मुंबईचा पर्याय निवडावा लागत आहे. मुंबईचा पर्याय खर्चिक असल्याने व्यवसायांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या टर्मिनलला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने काही तांत्रिक त्रुटी असल्यास त्या तातडीने दूर करायला हव्यात.- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ