पुणे : पत्नीने जेवणात चिकन न दिल्याने वडिलांनी मुलीच्या डोक्यात वीट मारुन तिला गंभीर जखमी केल्याची घटना पाषाण परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

हेही वाचा – ‘स्मार्ट सिटी’चा स्मार्ट कारभार? पुण्यातील हवेच्या गुणवत्तेची माहिती हवीय? मग पैसे द्या!

विकास नागनाथ राठोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत रघुनाथ लालू पवार यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड आणि पवार नातेवाईक आहेत. २७ नोव्हेंबर रोजी विकास रात्री साडेअकराच्या सुमारास घरी आला. पत्नीने त्याला जेवणाचे ताट दिले. पत्नीने चिकन न केल्याने विकास चिडला. त्याने घरात असलेली वीट मुलीच्या डोक्यात मारली. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विकास पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The father hit the girl on the head with a brick because the wife did not give chicken for dinner this incident took place in pashan area pune print news rbk 25 ssb