पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन तृतीयपंथी चितेजवळ जादूटोना सारखे अघोरी कृती करताना आढळून आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तृतीयपंथींना अटक केली असून लक्ष्मी निबाजी शिंदे (वय ३१ रा. मुंबई) आणि मनोज अशोक धुमाळ (वय २२ रा.कोथरूड पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा- पुणे: लाल महाल ते पानिपत दुचाकी मोहीम; सशक्त भारत समूहातर्फे पानिपत गौरवगाथा जागर अभियान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैकुंठ स्मशानभूमीत आज (शुक्रवारी) रात्री १ वाजण्याच्या सुमारास एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही तासाने लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ हे चितेजवळ आले. त्यानंतर दोघांनी त्यांच्यासोबत आणलेले काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन काही तरी कृती करीत होते. त्याचवेळी स्मशानभूमीमधील एक कर्मचारी आतमध्ये फेरी असताना त्याच्या निदर्शनास या गोष्टी पडल्या. त्याने काही अंतरावर जाऊन पाहिल असता आरोपी जादूटोना सारखं काही तरी करत असल्याचे त्याला दिसून आले.

हेही वाचा- पुणे: ‘ॲकॅडमिक क्रेडिट बँक’साठी साडेचार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; प्र-कुलगुरू संजीव सोनवणे यांची माहिती

त्या प्रकाराबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले. आरोपींजवळ काही व्यक्तीचे फोटो जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे कोणाबद्दल जादूटोना करीत होते. त्याबाबत दोघांकडे चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात नरबळी व इतर अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले.