पुणे : सायबर चोरट्यांकडून नवीन क्लुप्त्या लढवून पुणेकरांच्या पैशांवर डल्ला मारला जात आहे. एका व्यक्तीला अकाउंट व्हेरिफिकेशनच्या बहाण्याने चोरट्यांनी तब्बल ७८ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. त्यांना फोन पेमध्ये युपीआय आयडी तयार करण्यास सांगितला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे हस्तांतरित करून घेत त्यांची फसवणूक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – शाळांतून आता खिचडी हद्दपार, नव्या पाककृतींचा पोषण आहार; नव्या पाककृती सुचवण्यासाठी तज्ज्ञांची समिती

हेही वाचा – पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन पथकाला थकबाकीदाराकडून शिवीगाळ..!

याप्रकरणी ५८ वर्षीय व्यक्तीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनोळखी मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ही घटना घडली आहे. तक्रारदार यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. संबंधित व्यक्तीने त्यांना तुमचे अकाउंट व्हेरिफिकेशन करायचे आहे अशी बतावणी केली. त्यांना फोन पेमध्ये युपीआय आयडी तयार करा असे सांगितले. त्यांनी आयडी तयार केल्यानंतर या क्रमांकधारकाने त्यांच्या खात्यातून ७८ हजार रुपये हस्तांतरित करून फसवणूक केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves cheated a person of rs 78000 on the pretext of account verification pune print news vvk 10 ssb