पुणे : पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर आणि भारत-पाकिस्तानदरम्यान तयार झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम पुणे विमानतळावरील उड्डाणांवरही झाला आहे. त्यानुसार गुरुवारी विविध मार्गांवरील तेरा उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
इंडिगो, स्पाइसजेटच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांशी कंपन्यांकडून संपर्क साधण्यात येत असून त्यांना पूर्ण रकमेची परतफेड किंवा अन्य पर्यायी उड्डाणांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संरक्षण विषयक आवश्यकतांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अमृतसर ते पुणे , पुणे ते कोची, चंडीगड ते पुणे, पुणे-हैदराबाद, राजकोट (हिस्सार) ते पुणे, पुणे ते जोधपूर, पुणे ते अमृतसर, पुणे-राजकोट, पुणे-सुरत, जोधपूर ते पुणे ही इंडिगो कंपनीची विमान सेवा रद्द करण्यात आली. तर, पुणे-भावनगर आणि पुणे ते जयपूर ही स्पाईसजेट कंपनीची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.