लोणावळा : लोणवळ्यातील भुशी धरणात पर्यटक तरुण बुडल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी घडली असून लोणावळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. साहिल सरोज अस बुडालेल्या तरुणाच नाव आहे. विकेंड आणि येरव्ही लोणावळ्यात वर्षाविहारसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यांनी सुरक्षित पर्यटन करावं आणि नियमांच पालन करून वर्षाविहाराचा आनंद लुटावा अस आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी केलं आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोणावळ्यात वर्षाविरासाठी आलेल्या पर्यटक तरुण भुशी धरणात बुडाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली अस लोणावळा पोलिसांनी सांगितल आहे. साहिल हा मुंबई चा आहे. तो, इतर सहकाऱ्यांसह लोणावळ्यात आला होता. दुपारच्या सुमारास तो भुशी धरणाच्या मागील धबधब्या पर्यंत पोहचला, तिथून तो खाली पडल्याच पोलिसांनी सांगितले आहे. रविवार विकेंड ला देखील असेच काही अतिउत्साही पर्यटक पाहण्यास मिळाले. उंच डोंगरावर, धबधब्याच्या काठावर थांबून वर्षाविहाराचा आनंद घेत होते. अशा ठिकाणी जाऊन स्वतः चा जीव धोक्यात घालू नये अस आवाहन लोणावळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी लोकसत्ता ऑनलाइन शी बोलताना केलं आहे. जिथे जिथे पर्यटक, पोलीस दिसतील अशा ठिकाणी वर्षाविहाराचा आनंद घ्यावा अस त्यांनी म्हटलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist drown in lonavala bhushi dam zws 70 kjp