पुणे : मेट्रोकडून कल्याणीनगर स्थानकाचे काम सुरू करण्यात आले असून गुरुवारपासून (२९ सप्टेंबर) या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेतील बदल २७ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. शिवाजीनगर न्यायालय ते नगर रस्त्यावरील रामवाडी दरम्यान मार्गिकेचे काम सुरू आहे. कल्याणीनगर येथील मेट्रो स्थानकाचे काम सुरू करण्यात येणार असून गुरुवारपासून (२९ सप्टेंबर) या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. कल्याणीनगर परिसरातील एन. एम. चव्हाण चौकाकडून गोल्ड ॲडलॅब मल्टीप्लेक्सकडे जाणारी वाहतूक तसेच ॲडलॅबपासून एन. एम. चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे- बिशप स्कुलकडून एन. एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक ॲडलॅब चौकातून उजवीकडे वळविण्यात येणार आहे. कल्याणीनगर गल्ली क्रमांक सात येथून डावीकडे वळून वाहन चालकांनी एन. एम. चव्हाण चौकाकडे जावे. कोरेगाव पार्क परिसरातील एबीसी फार्म चौकातून येणाऱ्या वाहनचालकांनी एन. एम. चव्हाण चौकातून डावीकडे वळावे. त्यानंतर कल्याणीनगर गल्ली क्रमांक तीन येथून उजवीकडे वळून ॲडलॅब चौकाकडे वळावे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes from today due to the work of kalyaninagar metro station pune print news tmb 01