कल्याणीनगर मेट्रो स्थानकाच्या कामानिमित्त आजपासून वाहतूक बदल | Traffic changes from today due to the work of Kalyaninagar metro station | Loksatta

पुण्यातील कल्याणीनगर मेट्रो स्थानकाच्या कामानिमित्त आजपासून वाहतूकीत बदल

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

पुण्यातील कल्याणीनगर मेट्रो स्थानकाच्या कामानिमित्त आजपासून वाहतूकीत बदल
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे : मेट्रोकडून कल्याणीनगर स्थानकाचे काम सुरू करण्यात आले असून गुरुवारपासून (२९ सप्टेंबर) या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेतील बदल २७ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. शिवाजीनगर न्यायालय ते नगर रस्त्यावरील रामवाडी दरम्यान मार्गिकेचे काम सुरू आहे. कल्याणीनगर येथील मेट्रो स्थानकाचे काम सुरू करण्यात येणार असून गुरुवारपासून (२९ सप्टेंबर) या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. कल्याणीनगर परिसरातील एन. एम. चव्हाण चौकाकडून गोल्ड ॲडलॅब मल्टीप्लेक्सकडे जाणारी वाहतूक तसेच ॲडलॅबपासून एन. एम. चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे- बिशप स्कुलकडून एन. एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक ॲडलॅब चौकातून उजवीकडे वळविण्यात येणार आहे. कल्याणीनगर गल्ली क्रमांक सात येथून डावीकडे वळून वाहन चालकांनी एन. एम. चव्हाण चौकाकडे जावे. कोरेगाव पार्क परिसरातील एबीसी फार्म चौकातून येणाऱ्या वाहनचालकांनी एन. एम. चव्हाण चौकातून डावीकडे वळावे. त्यानंतर कल्याणीनगर गल्ली क्रमांक तीन येथून उजवीकडे वळून ॲडलॅब चौकाकडे वळावे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : समाजमाध्यमावरील ओळखीतून तरुणाची आर्थिक फसवणूक ; वकिलाच्या विरोधात गुन्हा

संबंधित बातम्या

राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ‘स्वराज्य’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक, संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांचा…”
‘राज ठाकरे हेच खरे जातीयवादी’; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
पुणे : …अन् मुख्यमंत्री शिंदेंनी तत्काळ आपला ताफा थांबवत आंदोलकांची घेतली भेट

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: राज्यातील किमान तापमानात वाढ होणार
‘राज ठाकरे हेच खरे जातीयवादी’; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा
जॉन्सन्सची बेबी टाल्कम पावडर वापरासाठी सुरक्षित; प्रयोगशाळांतील अहवातून स्पष्ट