पुणे : गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक बदल|traffic changes work on double decker flyover on ganeshkhind road pune | Loksatta

पुणे: गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूकीत बदल

भोसलेनगरकडून कॉसमॉस बँकेजवळील चौकातून गणेशखिंड रस्त्यावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

पुणे: गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूकीत बदल
प्रातिनिधिक छायाचित्र

गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकात दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात येणार आहेत.आचार्य आनंदऋषीजी चौकापासून काॅसमाॅस बँक गल्ली चौक, गणेशखिंड रस्त्यावरुन भोसलेनगरकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.

भोसलेनगरकडून कॉसमॉस बँकेजवळील चौकातून गणेशखिंड रस्त्यावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे भोसलेनगर किंवा रेंजहिल्सकडून सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ आणि पाषाणकडे जाणारी वाहने रेंजहिल्स चौकातून डावीकडे वळून वीर चापेकर चौकातून वळून इच्छितस्थळी जातील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 10:24 IST
Next Story
पुणे: हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्याच्या संचालकांना दिल्ली पोलिसांची नोटिस